इरफान खानने ‘या’ अनुभवानंतर छोट्या पडद्यावर केले नाही काम

इरफान खान

मुंबई: अभिनेते इरफान खान यांचे २९ एप्रिलला निधन झाले. मात्र इरफान खानच्या निधनानंतर अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. इरफानने छोट्या पडद्यावर काम न करण्याचे कारण नुकतेच समोर आले असून सध्या याची चर्चा होत आहे.

प्रसिद्ध फिल्मी जर्नलिस्ट भावना सोमया यांनी इरफानची ही आठवण शेअर केली आहे. इरफान छोट्या पडद्यावर ९० च्या दशकात कार्यरत होता. त्यावेळी तो एक क्राईम सिरीज करत होता. छोट्या पडद्यावरचं शुटींग इतक जास्त असायचं की त्यासाठी रात्रंदिवस शूट कराव लागायचं. एका दिवशी इरफान आपल्या शूट वरून परतत होता. तो शुटींगने इतका थकला होता, की त्याला कार चालवताना झोप येत होती. आणि एक क्षण असा आला की इरफानला झोप कंट्रोल करणं शक्य झालं नाही आणि कार चालवता चालवता त्याला कारच्या स्टेअरिंगवरचं झोप लागली.

इरफानने ज्यावेळी डोळे उघडले तेव्हा त्याला काही समजत नव्हत मात्र सूर्याची किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडत होती. अशाचं अवस्थेत तो घरी पोहचला. आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. या सर्व प्रकाराने इरफान खूपच घाबरला होता आणि गोंधळून गेला होता. त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की या प्रकारामुळे तो कित्येक दिवस त्याच्या खोलीतून बाहेर निघत नव्हता. त्यावेळी इरफानने ठरवलं, काम नसेल तरी चालेल असे म्हणत त्याने त्या पुढे कधी ही छोट्या पडद्यावर काम केले नाही.

महत्वाच्या बातम्या

IMP