‘योगी’राज मध्ये नववधुंची फसवणूक

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशमधील ओरिया जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत आयोजित विवाह सोहळ्यात नववधूंना चांदीच्या जागी लोखंडाची पैंजण आणि जोडवी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या फसवण्यात आल्याची तक्रार काही नववधूंनी जिल्हाधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्याकडे केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. जिल्हाधिका-यांनी दागिन्यांचं वाटप करण्याची जबाबदारी असणा-या कंपनीचं काम सध्या थांबवलं आहे.

रचना कुमारी, सरबीन, पिंकी, सत्यवती, यासमीन बानो, नीरज आमि कुसुमलता या नववधूंनी जिल्हाधिका-यांकडे लोखंडाचे दागिने मिळाल्याची तक्रार केली. योजनेच्या नावाखाली आपली फसवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामुळे आपल्याला प्रचंड दुख: झाल्याच प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...