क्रिकेटर इरफान पठाण झाला बाबा

टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटर इरफान पठाणच्या घरी नवा पाहुणा आला आहे. इरफानची पत्नी सफा बेगने एका मुलाला जन्म दिला आहे. मंगळवारी सोशल मीडियावर इरफानने बाबा झाल्याचे ट्विट करत ही  गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  ‘इस एहसास को बयाँ करना मुश्किल है… इस मे एक बेहतरीन सी कशिश है.. आम्हाला गोंडस मुलगा झाला’ असे ट्विट इरफानने केले आहे.
इरफान आणि सफाची भेट दुबईमध्ये झाली होती.  मग दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांनी निकाह केला.