अयोध्या निकाल : फिर्यादी इक्बाल अन्सारी यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचून अवघ्या देशाला आनंद होईल

blank

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्येतील वादग्रस्त जागेवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर शनिवारी निकाल दिलागेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद खटला प्रकरणी आज अंतिम निर्णयाचे वाचन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांचे खंडपीठ सकाळी साडेदहा वाजल्यापासून या खटल्याल्याच्या निर्णयाचे वाचन करीत होते.

सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या प्रलंबित खटल्यावर निकाल दिला आहे. राम लल्लाच्या बाजूने देण्यात आलेल्या या निर्णयामध्ये मुस्लिम समुदायासाठीसुद्धा पाच एकर जमीन देण्यात यावेत असे आदेश केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिले आहेत.

केंद्र सरकारने वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करावा. तसेच मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय न्यायालयानं दिला. न्यायालयाच्या निर्णयावर या खटल्यातील फिर्यादी असलेल्या इक्बाल अन्सारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आनंदी आहे की, सर्वोच्च न्यायालयानं अखरे निकाल दिला. न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा मला आदर आहे असं त्यांनी म्हटलय.

आजच्या निकालामुळे सर्वसामान्य देशवासीयांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला. एकीकडे शेकडो वर्षांपासून असलेल्या हिंदूंच्या आस्था जपल्या तर दुसरीकडे मुस्लिम समाजालाही न्याय दिला असं खा. संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,या निकालानंतर आता कॉंग्रेसने भाजपला डिवचले आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झाली असून आता या निकालामुळे रामाचा राजकारणासाठी होत असलेला वापर थांबेल असं कॉंग्रेसने म्हटलं आहे. रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी न्यायालयाची निकालाचे स्वागत केले तर याच वेळी भाजपला चिमटा काढायला ते विसरले नाहीत.

महत्वाच्या बातम्या