सीबीआयच्या संचालकपदी आयपीएस ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती

blank

टीम महाराष्ट्र देशा : राकेश अस्थाना यांची सीबीआयच्या संचालकपदावरून सुट्टी झाल्यानंतर आता ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषीकुमार शुक्ला हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीच्या बैठकीत शनिवारी सीबीआयच्या नवीन संचालकांची घोषणा करण्यात आली.

सीबीआयच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी निवड समितीची दुसरी बैठक पार पडली. पण या बैठकीत नियुक्ती बाबतचा कोणताच निर्णय झाला नव्हता.दरम्यान आज झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, सीबीआयचे संचालक म्हणून ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऋषीकुमार शुक्ला हे 1983च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच ते मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक (डीजीपी) देखील होते.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. जस्टिस अरुण मिश्रा आणि नविन सिन्हा यांच्या बेंचने केंद्र सरकारला सांगितले की हे पद संवेदनशील आहे. त्यामुळे आतापर्यंत सीबीआयच्या संचालक पदाची नियुक्ती होणे आवश्यक आहे. त्यावर सरकारने कोर्टाला सांगितले की निवड समितीची बैठक होऊन लवकरच नियुक्ती होईल. त्यानुसार राकेश अस्थाना यांच्यानंतर एम नागेश्वर राव यांनी सीबीआयच्या संचालक पदाचा तात्पुरता भार सांभाळला होता त्यानंतर आता केंद्र सरकार कडून आयपीएस ऋषीकुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.