Ips Mahesh Bhagwat- मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याचा  अमेरिकेत सन्मान

वेबटीम / हैदराबाद, दि. 29 – तेलंगणामध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा  अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड’ देऊन केला आहे.  महेश भागवत हे महाराष्ट्रातील मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. सध्या ते हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

महेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणात शेकडो बालमजुरांची सुटका केली. तसेच त्याठिकाणी चालणारे देहविक्री व्यवसाय  बंद केले आहेत . तेलंगणामधील मानवी तस्करीसोबत संबंध आलेल्या पुणे, बंगळुरू, दिल्ली तसंच सिंगापूर येथील केंद्रावरही महेश भागवत आणि त्यांच्या पथकानं कारवाई केली आहे.