‘कसोटी प्रमाणे आयपीएल रद्द होऊ नये’; विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

viart

नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. कसोटी सामना रद्द झाल्यानंतर खेळाडू आता आयपीएलसाठी यूएईमध्ये दाखल झाले आहेत.

आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू दुबईला रवाना झाले आहेत. कसोटी सामन्यासाठी इंग्लंडमध्ये असणारे खेळाडू देखील दुबईला रवाना होत आहेत. रविवारी विराट कोहली आणि मोहम्मद सिराज हे दोघे देखील दुबईमध्ये दाखल झाले.

युएईमध्ये येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे उर्वरित पर्व सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरसीबीच्या डिजीटल माध्यमांवरुन संवाद साधताना कोहलीने युएई आणि ओमानमधील क्रिकेट स्पर्धा या किती आव्हानात्मक असतील यावर भाष्य केलं आहे. तसेच कोहली म्हणाला, ‘हे दूर्देवी आहे की आम्हाला येथे लवकर यावं लागलं. मात्र करोनामुळे बऱ्याच गोष्टी अनिश्चित आहेत. अशा परिस्थितीमध्ये काहीही घडू शकतं. अपेक्षा आहे की येथे एक चांगलं, सक्षम आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यामध्ये (बायो बलल सुरक्षित ठेवण्यात) यश येईल आणि आयपीएलचं हे पर्व शानदार असेल,’ अशी अपेक्षा कोहलीने व्यक्त केलीय.

महत्वाच्या बातम्या