आयपीएलची टशन रंगणार; अधिकृत परवानगी मिळाली

IPL

नवी दिल्ली: कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला असून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर कित्येकांना बेरोजगारीशी देखील सामना करावा लागत आहे. यातच, कोट्यवधी चाहते असणाऱ्या आयपीएल (IPL) या टी-२० क्रिकेट प्रकाराच्या मालिकेस देखील तात्काळ पुढे ढकलावे लागले होते. बीसीसीआयतर्फे सप्टेंबरमध्ये हि स्पर्धा खेळवण्यास विचार केला जात आहे.

दरम्यान ,अडसर ठरू शकणाऱ्या टी-२० विश्वचषक यंदाच्या वर्षी रद्द करून पुढे ढकलण्यात आल्यानंतर IPL च्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला होता. कोरोनाचा धोका बघता आयपीएल चे सर्व सामने यूएईमध्ये खेळवणार जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयने याआधीच केली होती. त्यानुसार, १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

तर, काही दिवसांपूर्वीच आयपीएलला तत्वतः मान्यता मिळाल्याचे सूत्रांकडून समजत होते, मात्र अधिकृत परवानगी मिळणे बाकी होते. यानंतर आज, आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाची अधिकृत परवानगी मिळाली असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘ आम्हाला इंडियन प्रीमिअर लीगचे यूएईमध्ये आयोजन करण्यासाठीची अधिकृत परवानगी मिळाली आहे’, यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले.

मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र;अशोक चव्हाणांचा भाजपवर थेट आरोप

तर, एकूण ८ फ्रँचायजी संघ या स्पर्धेत भाग घेणार असून, या संघांतील सर्व खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं देखील समजत आहे. तर, खेळाडूंच्या कोरोना चाचणीची देखील तयारी करण्यात येत आहे. या स्पर्धेचे सामने दुबई, शाहजाह आणि अबुदाभी येथील स्टेडियममध्ये पार पडतील.

राणे विरुद्ध शिवसेना वाद वाढला;एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली