ब्रॅड हॉज सांभाळणार ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा

brad

मोहाली : ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाच्या प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ब्रॅड हॉज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन मोसमांमध्ये ब्रॅड हॉज ‘गुजरात लायन्स’चे प्रशिक्षक होते. 42 वर्षीय हॉज मुख्य प्रशिक्षक असतील तर त्यांना साह्य करण्यासाठी दिल्लीचा माजी फलंदाज मिथून मन्हास आणि जे. अरुणकुमार यांचीही निवड झाली आहे. ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’चे संचालक म्हणून भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग काम पाहत आहेत. संजय बांगर यांची भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून नि

ब्रॅड हॉज यांचा अल्प परिचय

‘आयपीएल’मध्ये हॉज यांनी यापूर्वी ‘कोची टस्कर्स केरळ’, ‘कोलकाता नाईट रायडर्स’ आणि ‘राजस्थान रॉयल्स’कडून फलंदाज म्हणून चांगली कामगिरी बजावली होती. ट्वेंटी-20 मध्ये सात हजारांहून अधिक धावा करणाऱ्या मोजक्या आठ फलंदाजांमध्ये हॉज यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-20 मालिकेमध्ये ते अजूनही खेळाडू म्हणून सहभागी होत असले, तरीही 2014 मध्येच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. हॉज यांनी सहा कसोटी, 25 एकदिवसीय आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.