मुंबई : जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) बाबत सतत चर्चा होत असते. आधी लिलावात खेळाडूंना मिळणारे पैसे आणि आता त्याचे माध्यम हक्क करार यावर प्रचंड चर्चा होत आहे. बीसीसीआयने आयोजित केलेल्या लिलावात यावेळी आयपीएलचे मीडिया हक्क मिळालेल्या कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पुढील पाच वर्षांसाठी ४४ हजार कोटींहून अधिकच्या लिलावासह आयपीएल ही जगातील दुसरी सर्वात महागडी स्पर्धा बनली आहे.
आयपीएलच्या मीडिया हक्कांबाबत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली चर्चा सोमवार १३ जूनला अखेर थांबली. अधिकृतपणे मीडिया अधिकार मिळवलेल्या कंपन्यांची नावे समोर आलेली नाहीत. परंतु माहितीनुसार, टीव्हीचे अधिकार सोनीला आणि डिजिटल अधिकार वायाकॉमला देण्यात आले आहेत. एएनआयच्या सूत्रांनुसार, २०२३-२०२७ साठी आयपीएल मीडिया अधिकार (टीव्ही आणि डिजिटल) ४४,०७५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. हे आधिकर दोन वेगवेगळ्या प्रसारकांनी विकत घेतले आहेत.
IPL media rights (TV & Digital) for the 2023-2027 cycle sold at Rs 44,075 crores; bid won by two separate broadcasters: Sources
— ANI (@ANI) June 13, 2022
त्याचवेळी, पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रसारण हक्क सोनी नेटवर्ककडे दिले आहेत. हा अधिकार मिळवण्यासाठी एकूण टीव्हीवर सामने दाखवण्यासाठी ५७.५ कोटी प्रति सामन्यासाठी (म्हणजे २३,५७५ कोटी रुपये) करार निश्चित करण्यात आला आहे. दुसरीकडे, डिजिटल अधिकारांबद्दल बोलायचे झाले तर अंतिम लिलाव प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी ४८ कोटी (२०,५०० कोटी) असल्याची माहिती आहे. एकूण ४१० सामन्यांसाठी मीडिया हक्क ४४,०७५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
According to reports, BCCI got a whopping INR 44,075 crore bid for #IPLMediaRights 🏆
😮107.5 Crore per match😮 pic.twitter.com/Uwc15SSq9A
— CricTracker (@Cricketracker) June 13, 2022
दुसरी सर्वात महागडी स्पर्धा
अमेरिकेतील फुटबॉल स्पर्धा एनएफएल (NFL) ही मीडिया हक्कांच्या बाबतीत सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जाते. या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याचे हक्क एकूण १३३ कोटींना विकले गेले आहेत. आता या यादीत बीसीसीआयची स्पर्धा आयपीएलही आली आहे. आयपीएलच्या एका सामन्याचे हक्क १०७.५ कोटींना विकले जाणारी ही जगातील दुसरी सर्वात महागडी स्पर्धा ठरली. इंग्लिश प्रीमियर लीगमधील एका सामन्याचे हक्क ८५.८ कोटींना विकले गेले आहेत.
IPL becomes the second most lucrative sporting property in the world. Wow 🤩
That’s when India is a ‘developing country’ and is apparently, not a ‘sporting nation’ either. The potential of our nation is limitless. Extremely proud 🤩🥳🤗 Jai Hind 🇮🇳— Aakash Chopra (@cricketaakash) June 13, 2022
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<