आयपीएल फायनल : जाण्यून घ्या समालोचक इयान बिशप यांनी का माफी मागितली?

टीम महाराष्ट्र देशा :  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा आयपीएलचा विजेता ठरला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर थरारक विजय मिळवला.

दरम्यान, या सामन्यात अनेक वादग्रस्त प्रसंग पहायला मिळाले. पोलार्ड आणि पंचांचा वाद चांगलाच गाजला तर धोनीला धावबाद दिल्याचा निर्णयही वादग्रस्त ठरला आहे. तर दुसऱ्या बाजूला एका अभद्र टिप्पणीबद्दल समालोचकाला देखील माफी मागावी लागली.

चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील सहाव्या षटकात लसिथ मलिंगाने शेन वॉटसनला टाकलेला एक वाइड चेंडू पंचानी योग्य असल्याचा निर्णय दिला. यावर शेन वॉटसनने F*****ng Wide अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याचा आवाज यष्टिच्या माइकने टेलिकास्ट झाला. यासंदर्भात समालोचक इयान बिशप यांनी ब्रॉडकास्टच्यावतीने माफी मागितली.