आयपीएल फायनल : मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग्स कोण मारणार बाजी ?

टीम महाराष्ट्र देशा- रविवारी म्हणजेच १२ मे रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल मॅच खेळली जाणार आहे. आयपीएलचा खिताब तीन वेळा आपल्या नावावर केलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात फायनल मॅच रंगणार आहे.

Loading...

चेन्नईचा संघ आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा धडक दिली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत तीन फायनल लढती झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईनं दोन वेळा चेन्नईला पराभूत केलं आहे. एकदा धोनीच्या संघाकडून मुंबईचा पराभव झाला आहे.

मुंबई इंडियन्सने याआधी चारवेळा फायनलमध्ये धडक मारली असून तीनवेळा त्यांनी जेतेपद जिंकले आहे. यातील २०१३ व २०१५ चे जेतेपद तर रोहित आणि कंपनीने चेन्नईला नमवूनच आपल्या नावे केले आहे. चेन्नई संघाने दोन वर्षांची बंदीची शिक्षा भोगून गेल्याच वर्षी लीगमध्ये यशस्वी पुनरागमन केले ते जेतेपदाला गवसणी घालत. यंदाही चेन्नई संघाने भरीव कामगिरी केली आहे.Loading…


Loading…

Loading...