स्टेडियमला परवानगी मिळाली असली तरी IPL आयोजित करणे शक्य नाही : BCCI

IPL

क्रिकेट : केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्याची घोषणा केली आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार स्टेडियम उघडता येऊ शकतात. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीग IPL होणार का याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.

#Corona : खेळांडूच्या प्रशिक्षण शिबिराबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही : BCCI

BCCI ट्रेजरर अरुण धूमल यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासावर बंदी आहे तोपर्यंत यावर्षी आयपीएल आयोजित करण्याबाबत कोणतीही योजना करता येणार नाही. आत्ताच आयपीएल घेणे शक्य नाही. कारण अंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रवास बंद आहे. अशा परिस्थितीत तुम्ही प्रवास न करता आयपीएल कशी काय खेळू शकता ? आम्ही आताच मार्गदर्शक तत्त्वे पहात आहोत आणि त्यानंतर राज्य सरकारांचे मार्गदर्शक सूचनाही आपण पाहू. यानंतर आम्ही IPLबाबत योजना करू.

आफ्रिदी गेला खड्ड्यात… देशासाठी मी बंदूकही उचलेन : हरभजन सिंग

दरम्यान बीसीसीआयने काल रात्री उशिरा जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोविड -19 थांबविण्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांकडे त्यांनी गांभीर्याने विचार केला आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, ते करार केलेल्या खेळाडूंच्या शिबिरासाठी थांबण्याची वाट पाहतील.

चाहत्यांसाठी खुशखबर ! भारताचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू करतोय मराठी चित्रपटात एन्ट्री

बीसीसीआयकडून सांगण्यात आले की, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची सुरक्षा प्रथम आहे हे बोर्ड स्पष्ट करु इच्छित आहे आणि कोरोना व्हायरसविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारताला अडचणीत आणणारा कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही.

दरम्यान, बीसीसीआय राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनांवर लक्ष केंद्रित करेल आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर कौशल्य-आधारित प्रशिक्षण सुरू करण्यावर विचार करेल, असे निवेदनात म्हटले आहे. बीसीसीआयचे अधिकारी संघ व्यवस्थापनाशी संवाद साधत राहतील आणि परिस्थिती सुधारण्यापर्यंत संपूर्ण टीमसाठी योग्य योजना तयार ठेवतील.