राहुल,बेन स्टोक्सला लॉटरी तर ख्रिस गेल अनसोल्ड

ipl 2018

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु झाला असून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला बंपर लॉटरी लागली आहे. राजस्थान रॉयल्सने तब्बल 12.50 कोटी रुपयात बेन स्टोक्सची खरेदी केली आहे. मागील सत्रात बेन स्टोक्सवर १४ कोटी ५० लाख रुपये इतकी बोली लागली होती. बेन स्टोक्सला विकत घेण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब आणि नाईट रायडर्समध्ये जोरदार प्रयत्न सुरु होते. पण अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत तब्बल 12.50 कोटी रुपयात बेन स्टोक्सची खरेदी केली.

Loading...

अकराव्या हंगामासाठी एकूण ५७८ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात ३६० भारतीय खेळाडू असून २१८ खेळाडू परदेशी आहेत. याआधी संघमालकांना आपल्या संघातील प्रत्येकी ३ खेळाडूंना संघात कायम राखण्याची मूभा दिली होती. यानुसार प्रत्येक संघांनी महत्वाच्या खेळाडूंना आपापल्या संघात कायम राखलं आहे, तर काही संघांनी या लिलावात नव्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

लाईव्ह अपडेट्स –

 • दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही
 • ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली
 • इंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
 • ब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
 • अॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली
 • डेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली
 • मुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही
 • राहुलवर ११ कोटी रुपयांची बोली लोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी
 • अखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली मुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड
 • युवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली
 • इंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही
 • केन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात
 • ब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं
 • गौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोली ,गौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
 • ग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
  हैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी
 • ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ
 • बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये
 • मुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली
 • ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे
 • अजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली
 • डु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली,दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे
 • बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख
 • वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही
 • कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली
 • अखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार
  रविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ
 • राईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे
 • पहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?