मुंबई: विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाशी कधी जोडला जाईल याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता आणि तो क्षण सोमवारी आला. तो आरसीबीच्या मुंबईतील शिबिरात सामील झाला. गेल्या नऊ मोसमात (२०१३-२१) फ्रँचायझीचे नेतृत्व केल्यानंतर, त्याने कर्णधारपद सोडले. अलीकडेच, RCB ने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसला आगामी हंगामासाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) सोशल मीडियाने विराटच्या आगमनाची माहिती दिली. त्यांनी विराटचे (Virat kohli) फोटो पोस्ट करत खाली लिहले “किंग कोहली आला आहे, हीच बातमी आहे.” IPL 2022 ची सुरुवात २६ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या जाणार्या स्पर्धेने होणार आहे.
King Kohli has arrived! That’s it. That’s the news. 🙌🏻👑 @imVkohli #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #ViratKohli pic.twitter.com/P8W9ICCwOX
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 21, 2022
आरसीबीला अद्याप आयपीएल जिंकता आलेले नाही आणि यावर्षी फ्रँचायझी त्यांच्या विजेतेपदाचा दुष्काळ मोडू पाहतील. संघ २७ मार्चला पंजाब किंग्जविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. गेल्या मोसमात, आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला होता, परंतु फ्रँचायझी उपांत्यफेरीत पोहोचण्यात अपयशी ठरली होती. २०२१ UAE लेग दरम्यान, कोहलीने घोषित केले होते की तो २०२२ च्या मोसमापासून फ्रँचायझीचे नेतृत्व करणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- “… तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू”, अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ सल्ल्यावर राऊतांचे प्रत्युत्तर
- IPL 2022 : ‘त्याने मला फिनिशर कसे बनायचे सांगितले’; दिल्लीच्या स्टॉइनिसला चेन्नईच्या ‘थाला’ने दिले मास्टरक्लास
- “ममता बॅनर्जींच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांना केंद्राने चणे-कुरमुरे वाटावेत अशी सुरक्षा…”, राऊतांचे टीकास्त्र
- धनंजय मुंडे पाच-सहा मुलांचे वडील; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप
- “सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ…”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<