मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंत गुजरात टायटन्स (GT) ही एकमेव टीम प्ले-ऑफसाठी पत्र ठरली आहे, तर उरलेल्या ३ जागांसाठी अजूनही स्पर्धा सुरू आहे. मुंबई (MI) आणि चेन्नई (CSK) हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. प्रत्येक खेळाडू स्वत:च्या टीमला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. सोबतच ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची शर्यतही आणखी तीव्र झाली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक गडी बाद करणाऱ्याला पर्पल कॅप दिली जाते. पर्पल कॅपच्या (Purple Cap) शर्यतीमध्ये हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik)चाही समावेश होता. पण मागच्या ३ सामन्यांमध्ये एकही गडी बाद न शकल्यामुळे तो आता मागे पडला आहे.
आयपीएल (IPL)मध्ये पर्पल कॅप जिंकणाऱ्या गोलंदाजाला मिळणाऱ्या रकमेपेक्षा उमरान मलिकने जास्त पैसे आताच कमावले आहेत. प्रत्येक सामन्यात सगळ्यात जास्त वेगाने चेंडू टाकणाऱ्या खेळाडूला १ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जातं. उमरानने आतापर्यंत खेळलेल्या सगळ्या ११ सामन्यांमध्ये फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे त्याला ११ लाख रुपये मिळाले आहेत.
पर्पल कॅप विजेत्याला १० लाख रुपये
पर्पल कॅप विजेत्या बॉलरला १० लाख रुपये दिलेत जातात. म्हणजेच पहिल्या ११ सामन्यांमध्ये उमरानने पर्पल कॅप विजेत्याला मिळणाऱ्या रकमेपेक्षा १ लाख रुपये जास्त मिळवले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या सगळ्यात जलद चेंडू फेकण्याचा विक्रमही उमरान मलिकच्या नावावर आहे. दिल्लीविरुद्ध रोव्हमन पॉवेलला त्याने १५८ किमी प्रती तासाच्या वेगाने चेंडू टाकला.
Umran Malik clocked the fastest ball of the season against the Delhi Capitals 🔥 https://t.co/c5kL8gAeoC | #DCvSRH | #IPL2022 pic.twitter.com/nF65VpcLQT
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 6, 2022
शॉन टेटचा विक्रम
आयपीएल (IPL) इतिहासात शॉन टेट (Shaun Tait)च्या नावावर सगळ्यात जलद चेंडू फेकण्याचा विक्रम आहे. २०११ राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिल्लीविरुद्ध एरॉन फिंचला टेटने हा चेंडू टाकला होता. टेटने टाकलेला हा चेंडू १५७.७१ किमी प्रती तासाच्या वेगाचा होता.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com