मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दिनेश कार्तिकने आपली चांगली कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी अनेक सामने जिंकले आहेत. १५व्या मोसमात त्याने फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. या वर्षी एका मुलाखतीदरम्यान दिनेश कार्तिक म्हणाला होता, की तो ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करू इच्छितो. भारताने ९ वर्षांनंतर आयसीसी स्तरावरील स्पर्धा जिंकावी अशी त्याची इच्छा आहे ज्यामध्ये तो योगदान देऊ शकेल. कार्तिकच्या आयपीएलमधील कामगिरीने सुनील गावसकर खूप खूश आहेत. टी-२० विश्वचषक संघात कार्तिकचा समावेश करण्याबाबत त्यांनी मत दिले.
‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मी आणि दिनेश कार्तिकने एकत्र कॉमेंट्री केली होती. यापूर्वी आम्ही दोघांनी क्वारंटाइनमध्ये बराच वेळ एकत्र घालवला होता. २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकात खेळण्यासाठी तो किती दृढनिश्चयी आहे हे मला तेव्हापासून माहीत आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकासाठी त्याची निवड झाली नव्हती, परंतु त्याने आयपीएल २०२२ मध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, जर मी निवडकर्ता असतो, तर मी त्याला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत निश्चितपणे संघात घेईन.”
Sunil Gavaskar makes a big statement on Dinesh Karthik’s T20 World Cup selection
Full Details Here 👇#Cricket #TeamIndia #IndianCricketTeam #DineshKarthikhttps://t.co/Z3wvkB0rcx
— SportsTiger (@sportstigerapp) May 12, 2022
गावसकर पुढे म्हणाले, ”फॉर्म महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते हा फॉर्म तात्पुरता असतो तर दर्जा कायमस्वरूपी असतो. जर एखादा दर्जेदार फलंदाज फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला त्याची निवड करावी लागेल. सध्या तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्याचा विचार करायला हवा. निव्वळ फलंदाज म्हणून त्याचा समावेश करावा आणि यष्टीरक्षण हा अतिरिक्त पर्याय असावा.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com