IPL 2022: आंद्रे रसेलच्या पॉवर हिटिंगचा ‘किंग खान’ही झाला फॅन; ट्वीट करत म्हणाला….

मुंबई: आयपीएलची रंजकता दररोज वाढतच जात आहे. कधी लखनऊ सुपर जायंट्सचा आयुष बदोनी आपल्या संघासाठी सामने जिंकताना दिसतो तर कधी रसेल आपल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकतो. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आंद्रे रसेलने ३१ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी खेळत सामना जिंकला. अशा परिस्थितीत केकेआरचा मालक शाहरुख खानही या स्टार खेळाडूचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मालक शाहरुख खानने (SRK) संघाचा सामना जिंकल्यानंतर आंद्रे रसेलचे (andre russell) ट्वीटरवर कौतुक केले आहे, तसेच उमेश यादवचेही कौतुक केले आहे. ट्वीट करताना शाहरुख खान म्हणाला, “मित्रा रसेल , तुझे पुन्हा स्वागत आहे, कधीपासून बॉल इतका उंच उडताना पाहिला नव्हता” रसेलच्या ७० धावांच्या खेळीत ८ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. रसेल बराच काळ फॉर्ममध्ये नव्हता. पण, त्याला जगातील सर्वोत्तम हिटर का म्हटले जाते, हे रसेलने पंजाबविरुद्ध पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक ३ सामने खेळले आहेत. ज्याचा त्यांना फायदाही झाला आहे. KKR ला खेळलेल्या ३ पैकी २ सामन्यात विजय नोंदवता आला आहे. त्यामुळे ते ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या