IPL 2022 : आज सनरायर्झसमोर रॉयल्सचं आव्हान; रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ ठरणार विजेता!

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. या आयपीएल हंगामातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघात काही मोठी नावे आहेत. त्याचबरोबर अनेक नवे चेहरेही यावेळी पाहायला मिळणार आहेत.
डेव्हिड वॉर्नर आणि राशिद खान यांच्याशिवाय हैदराबाद नवा अध्याय सुरू करेल. आयपीएलमध्ये हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत १५ सामने खेळले गेले असून, हैदराबाद ८-७ने आघाडीवर आहे.

सध्याच्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक ६१५ धावा केल्या आहेत. त्यांचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. या आयपीएल हंगामात तो संघाचा भाग नाही. अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खान सनरायझर्स हैदराबादसाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खूप यशस्वी ठरला आहे, पण तो आता सनरायझर्स हैदराबाद संघात नाही.

राजस्थान रॉयल्ससाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे. गेल्या मोसमात त्याने १२४ धावांची इनिंग खेळली होती.

महत्त्वाच्या बातम्या –