IPL 2022 SRH vs RCB : विराट कोहली परत शून्यावर..! बंगळुरूचं हैदराबादला १९३ धावांचं आव्हान

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज डबल हेडरचा पहिला सामना दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात बंगळुरूने हैदराबादला १९३ धावांचे आव्हान दिले. विराट कोहली पुन्हा गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी केली आणि दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावली. या सामन्यात डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

बंगळुरूचा डाव

विराट कोहली यंदाच्या मोसमात पुन्हा हैदराबादविरुद्ध आणि एकूण तिसऱ्यांदा गोल्डन डकवर बाद झाला. हैदराबादचा फिरकीपटू जगदीश सुचितने विराटला केन विल्यमसनकरवी पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर कप्तान फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी रचत दबाव दूर केला. पाटीदारने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या, सुचितनेच त्याला बाद केले. डु प्लेसिसने अर्धशतक ठोकत ग्लेन मॅक्सवेलसह डाव पुढे नेला. ३ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावांची खेळी करून मॅक्सवेल १९व्या षटकात बाद झाला. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने वेगवान गोलंदाज फजलहक फारूखीला लागोपाठ ३ षटकार ठोकत फिनिशरला साजेशी खेळी केली. कार्तिकने ८ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३० धावा केल्या. तर डु प्लेसिसने ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. २० षटकात बंगळुरूने ३ बाद १९२ धावा केल्या.

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंह, जगदीशा सुचित, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com