मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील क्वालिफायर २ चा सामना शुक्रवारी बंगळुरू आणि राजस्थान या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात राजस्थान मे बंगळुरू वर सहज विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. बंगळुरूच्या पराभवानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आयपीएल २०२२ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या कर्णधारपदावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने फाफ डू प्लेसिसच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोश हेझलवूडसारख्या सर्वोत्तम गोलंदाजाचा योग्य वापर केला नसल्याचे सांगितले.
सेहवागच्या मते, हेझलवूडला डावाच्या सुरुवातीलाच लागोपाठ तीन षटके टाकण्याची संधी होती आणि या षटकांमध्ये त्याच्याकडे नवीन चेंडूने विकेट घेण्याची क्षमता आहे. मात्र जोश हेझलवूडने दुसरे षटक टाकले आणि नंतर थेट सहाव्या षटकात गोलंदाजी करायला आला. तिथे त्याने सहाव्या षटकात आपल्या संघाला यश मिळवून दिले. त्यामुळे तुम्ही तुमच्या बळी मिळवून देणाऱ्या गोलंदाजाला अशा प्रकारे रोखू शकत नाही. मी कर्णधार असतो तर, मी जोश हेझलवूडच्या षटकाने डावाची सुरुवात केली असती आणि त्याला सलग तीन षटके टाकण्याची संधी दिली असती, कारण राजस्थान रॉयल्सच्या वरच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करूनच बंगळुरू संघाचा सामना जिंकू शकला असता.
सेहवागच्या म्हणण्यानुसार, डु प्लेसिसला कर्णधार पदाचे नेतृत्वाची चांगली जबाबदारी सांभाळता येते आणि तो मैदानावर फार कमी चुका करतो. मात्र, या सामन्यात त्याच्याकडून चूक झाली.
त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवामुळे बंगळुरूचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून त्यांचे आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<