मुंबई : आयपीएलचा बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल २०२२च्या आधी सराव शिबिराच्या सहाव्या दिवशी मुंबई पलटणने टीम बाँडिंगवर लक्ष केंद्रित केले. रोहित शर्माने अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरशी मराठीतून संवाद साधला. कायरन पोलार्डला त्याची अधिकृत किट मिळाली. मुंबई इंडियन्स एरिनामध्ये इशान किशन टॉय गन घेऊन खेळला आणि जसप्रीत बुमराह तरुणांसोबत मस्ती करताना दिसला.
मुंबई इंडियन्सने यासंबंधी एक मजेशीर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. रोहित अर्जुनसोबत गप्पा मारताना दिसला. त्यानंतर पोलार्डला मुंबई संघाची जर्सी मिळाली. त्यानंतर संघाचे सर्व सदस्य मैदानावर गप्पागोष्टी करताना दिसले.
हा व्हिडिओ बहुधा ट्रायडंट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील आहे, जिथे मुंबई इंडियन्सचे खेळाडू १२ दिवसांच्या शिबिरासाठी थांबले आहेत. मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, एन. तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स, टी. डेव्हिड, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, फॅबियन एलन आणि आर्यन जुयाल.
महत्त्वाच्या बातम्या –