पुणे : आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका संपत नाहीये. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या पराभवासह त्यांना या मोसमात सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. मुंबईच्या पराभवानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. संघ आता सर्व सामने गमावून गुणतक्त्याच्या तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्मा म्हणाला, ”आम्ही चांगले खेळलो, विजयाच्या अगदी जवळ आलो, काही धावबाद आम्हाला उपयोगी पडले नाहीत. उत्तरार्धात चांगली गोलंदाजी करण्याचे श्रेय पंजाबला जाते. आम्ही वेगळ्या विचार प्रक्रियेसह खेळण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु ते चांगल्या प्रकारे होत नाहीये. जे चांगले खेळले त्यांचे श्रेय मला घ्यायचे नाही आणि पंजाबने आज ते केले.”
”आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाही, आम्हाला परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार वागण्याची गरज आहे. आमच्या गोलंदाजांवर दबाव होता पण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती आणि मला वाटले की १९८ धावांचा पाठलाग करता आला असता. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला चांगल्या तयारीने परत यावे लागेल.”
असा रंगला सामना…
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२मध्ये सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईला १२ धावांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या रोहितने गोलंदाजी स्वीकारली. पंजाबने मुंबईला १९९ धावांचे तगडे आव्हान दिले आहे. शिखर धवन, मयंक अगरवाल यांनी अर्धशतके ठोकत पंजाबला उत्तम सुरुवात करून दिली. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकात १८६ धावांपर्यंतच पोहोचता आले. शेवटच्या काही षटकात मुंबईने महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि पंजाबने सामना हिसकावून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : रोहित शर्माला २४ लाखांचा दंड; मुंबई इंडियन्सवर ‘मोठी’ कारवाई!
- सुजात आंबेडकरांची राजकारणात एन्ट्री ?, प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा खुलासा
- इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले
- “तुम्ही शेण खाता आणि दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेता”; राऊतांचा सोमय्यांना टोला
- “सगळ्या अपेक्षा राज ठाकरेंकडूनच का?” – तृप्ती देसाई
- “घरगुती मुख्यमंत्री अखेर…” ; सदाभाई खोतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com