मुंबई : आयपीएल (IPL 2022) चा हंगाम आता अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. गुजरात संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले असून इतर संघांची नाव लवकरच स्पष्ट होतील. यंदाच्या हंगामातही धावांचा पाऊस पडला. अनेक फलंदाजांनी उत्तुंग षटकार ठोकून खेळाडूंसह प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय, असेही काही खेळाडू आहेत. त्यांना या हंगामात एकही षटकार मारता आलेला नाही. विशेष म्हणजे, असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासात आजही त्या खेळाडूंच्या विक्रमांची नोंद आहे.
१) ख्रिस गेल- १७ षटकार
वेस्ट विंडीजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलने आयपीएलच्या १४२ सामन्यांमध्ये ४० च्या सरासरीने आणि १४८.९६ च्या स्ट्राईक रेटने ४ हजार ९६५ धावा केल्या आहेत. त्यानं २०१३ साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध ६६ चेंडूत १७५ धावांची नाबाद वादळी खेळी केली होती. या सामन्यात त्यानं १३ चौकार आणि १७ षटकार ठोकले होते. त्याचे चाहते त्याला द युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखतात.
२) ब्रँडम मॅक्क्युलम- १३ षटकार
न्यूझीलंडचा माजी तडाखेबाज फलंदाज ब्रँडम मॅक्युलमने आयपीएलच्या १०९ सामन्यांमध्ये २७.६९ च्या सरासरीने २ हजार ८८० धावा केल्या आहेत. २००८ साली रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना ७३ चेंडूत १५८ धावा केल्या होत्या. ज्यात १० चौकार आणि १३ षटकारांचा समावेश होता.
३) ख्रिस गेल- १३ षटकार
ख्रिस गेलने २०१२ साली आरसीबीकडून खेळताना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ६२ चेंडूत नाबाद १२८ धावांची खेळी केली होती. ज्यात त्याने ७ चौकार आणि १३ षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २०६.४५ होता.
Most sixes in IPL history👌🔥#CSKvRCB pic.twitter.com/X0l7gKLzUk
— Vignesh Vicky💛 (@Itz_vicky228) September 24, 2021
४) ख्रिस गेल- १२ षटकार
ख्रिस गेलनं २०१५ साली आरसीबीकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध ५७ चेंडूत ११७ धावांची खेळी खेळली होती. ज्यात त्याने ७ चौकार आणि १२ षटकार मारले होते.
५) एबी डिव्हिलियर्स – १२ षटकार
दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध आहे. २०१६ मध्ये गुजरात लायन्स विरुद्ध आरसीबीकडून खेळताना ५२ चेंडूत नाबाद १२९ धावांची खेळी केली होती. एबी डिव्हिलियर्सच्या आक्रमक खेळीत १० चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com