मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामामध्ये मुंबई इंडियन्सने खूप खराब कामगिरी केली. पाचवेळचा विजेता हाच तो संघ का? असा प्रश्न क्रिकेट चात्यांना पडला आहे. मुंबईने ११ सामन्यांत ९ सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचे दारही केव्हाच बंद झाले आहेत. उरलेल्या लढतींमध्ये मुंबई संघ सन्मानजनक कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे पहिले कारण आहे गोलंदाजी. अन्य संघांच्या तुलनेत मुंबईकडे जसप्रीत बुमराह सोडल्यास दुसरा एकही प्रभावी गोलंदाज नव्हता. त्यांनी इंग्लडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला लिलावात मोठी रक्कम देऊन खरेदी केले होते. मात्र तो मुंबई संघासाठी उपलब्ध राहिला नाही. रोहित शर्मा आणि इशानची जोडी हे मुंबईच्या पराभवाचे दुसरे कारण आहे. एखाद-दोन सामने सोडल्यास ही सलामी जोडी सातत्याने अपयशी ठरली. दोघांनाही टीमला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. मुंबईच्या पराभवाचे तिसरे कारण टिम डेविड सारख्या प्रतिभाशाली फलंदाजाला सहा सामने बाहेर बसवणं. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूला मुंबईने ८ कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजून विकत घेतले होते.
मुंबई इंडियन्सकडे कायरन पोलार्ड सारखा फिनिशर आहे. पण या हंगामात पोलार्डची बॅटच चालली नाही. त्यांच्या खेळीची मुंबई संघाला गरज असताना तो फ्लॉप ठरला. अनेकदा संधी असूनही तो मुंबईला विजय पथावर नेऊ शकला नाही. इशान किशन सारख्या एका खेळाडूवर मुंबईने १५ कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. एवढ्या रक्कमेत ते अजून चांगले गोलंदाज आणि फलंदाज घेऊ शकले असते. पोलार्ड ऐवजी इशान किशनला रिटेन केलं असतं, तर मुंबईचाच फायदा झाला असता.
IPL 2022 Points Table – Gujarat Titans have the 'Q' with their name now. Playing their debut season and have been absolutely fantastic. pic.twitter.com/cdW1KWmyO9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2022
मुंबईची गुणतालिकेतील जागा
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. संघाने ११ सामन्यांत २ विजय मिळवले असून त्यांचे ४ गुण आहेत. मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. या हंगामात सर्वात आधी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला मुंबईचा संघ सध्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय. शिल्लक राहिलेल्या दोन लढती जिंकून मुंबई चांगला शेवट करण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com