मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ६०वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमनेसामने असतील. आरसीबीचा हा स्पर्धेतील १३वा सामना असेल. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १२ पैकी ७ सामने जिंकून १४ गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत आरसीबीला प्लेऑफमधील आपला दावा आणखी मजबूत करण्यासाठी पंजाबविरुद्ध विजयाची नोंद करावी लागेल.
त्याचवेळी पंजाब किंग्ज त्यांचा १२वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पंजाबने या स्पर्धेत आतापर्यंत केवळ ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत त्यांचे केवळ १० गुण आहेत. अशा स्थितीत साखळी फेरीत पंजाबच्या नजरा आता उर्वरित सर्व सामने जिंकण्यावर आहेत. पंजाबच्या एका पराभवामुळे त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद होऊ शकतात. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये आज होणारा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
An 𝗠 n 𝗠 meeting before our all important game tonight. 😉🤜🏻🤛🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvPBKS pic.twitter.com/Hhmg1fbs2n
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 13, 2022
आयपीएलमध्ये जेव्हा-जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत, तेव्हा ही स्पर्धा चुरशीची झाली आहे. पंजाबच्या बाजूने आकडेवारी अधिक असली तरी आरसीबीच्या संघानेही त्यांना बरोबरीची स्पर्धा दिली आहे. त्याचबरोबर या लीगमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले आहेत. यात पंजाबने १६ सामने, तर आरसीबी संघ १३ सामने जिंकू शकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com