मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये लीग टप्प्यातील फक्त तीन सामने शिल्लक आहेत. आज स्पर्धेतील ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आरसीबीला आज मोठा विजय आवश्यक आहे. ते १४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत आणि त्यांचा नेट रन रेट निगेटिव्ह आहे. दुसरीकडे, गुजरातने याआधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
आज गुजरात संघात लॉकी फर्ग्युसनचे कमबॅक झाले आहे. तर बंगळुरूने मोहम्मद सिराजऐवजी सिद्धार्थ कौलला संधी दिली आहे. आरसीबीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाबकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या नेट रन रेटवर झाला होता. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघाला गुजरात टायटन्सचा पराभव करावा लागणार आहे. गेल्या सामन्यात संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड चांगलाच महागडा ठरला. याशिवाय विराट कोहलीचा खराब फॉर्म आणि मोहम्मद सिराजची गोलंदाजीही संघासाठी अडचणीची ठरली आहे. मात्र, रजत पाटीदार आणि वानिंदू हसरंगा या खेळाडूंनी आतापर्यंत संघासाठी शानदार खेळ दाखवला आहे.
.@gujarat_titans have won the toss and they will bat first against #RCB
Live – https://t.co/XDXRjk2XBc #RCBvGT #TATAIPL pic.twitter.com/ruWHoEqfsL
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या गुजरातसाठी सर्व काही ठीक आहे. पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत वृद्धिमान साहाने आक्रमक खेळ करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. दुसरीकडे, राशिद खान गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने विकेट घेत आहे. मात्र, संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याचा फलंदाजीचा फॉर्म नक्कीच चिंतेचा विषय आहे.
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, जोश हेझलवूड.
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com