IPL 2022 गाजवलेल्या दिनेश कार्तिकचं टीम इंडियात कमबॅक..! ‘गूड न्यूज’ मिळाल्यानंतर म्हणतो…

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. या संघात काही युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर अनेक ज्येष्ठ खेळाडूही परतले आहेत. या यादीत दिनेश कार्तिकचेही नाव आहे. आयपीएल २०२२ कार्तिकसाठी आतापर्यंत खूप छान ठरली आहे. संघासाठी फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या कार्तिकने ५७.४०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. टीम इंडियात पुनरागमन करताना कार्तिकला या अप्रतिम कामगिरीची भेट मिळाली. भारतीय संघात निवड झाल्यानंतर कार्तिकने सोशल मीडियावर ट्वीट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

दिनेश कार्तिकने ट्वीट केले, “जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर सर्व काही ठीक होईल. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार… कठोर परिश्रम सुरूच आहेत…” आरसीबी बोल्ड डायरीजमधील संभाषणादरम्यान, कार्तिकने त्याच्या आयपीएल संघाचे आभार मानले. तो म्हणाला, “माईक हेसन आणि संजय बांगर यांना खूप श्रेय जाते. त्यांनी मला हवी असलेली स्पष्टता दिली. आरसीबीने मला निवडले आणि भूमिका दिली आणि मी त्यांचा अनेक प्रकारे ऋणी आहे. फ्रेंचायझीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी या फ्रेंचायझीसाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न देखील केले.”

आयपीएल २०२२मध्ये, कार्तिकने १४ सामन्यांमध्ये ५७.४०च्या सरासरीने आणि १९१.३३च्या स्ट्राइक रेटने २८७ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महत्त्वाच्या बातम्या –