मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील आता फक्त ४ सामने राहिले आहेत. आजूनही प्लेऑफ मधील उरलेल्या दोन जगासाठी ५ संघ झुंज देत आहेत. यंदाच्या हंगामातील नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन फ्रँचायझी प्ले ऑफसाठी पात्र ठरल्या आहेत. तर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स, चार वेळा विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन वेळा विजेता कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल २०२२ मधून बाहेर पडले आहेत. बुधवारी रात्री लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणारा कोलकाता हा तिसरा संघ ठरला. आयपीएलच्या इतिहासात मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यापैकी कोणताही संघ प्लेऑफमध्ये सहभागी नसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्वात आगोदर मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर
पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम धक्कादायक ठरला आहे. मुंबईला आयपीएल २०२२ च्या त्यांच्या पहिल्या ८ सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १३ सामन्यांपैकी मुंबई इंडियन्स फक्त तीनच सामने जिंकू शकली आहे आणि पॉइंट टेबलमध्ये तळाशी बसलेली आहे. प्लेऑफमधून बाद होणारा मुंबई पहिला संघ आहे.
Points table of IPL 2022. Two New teams GT and LSG qualify for the playoffs. pic.twitter.com/ZZsu1gR7F5
— Gaurav Singh (@GauravS20880650) May 18, 2022
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधारपदाचा घोळ
चेन्नईचा नियमित कर्णधार महेंद्र सिंह धोनी अचानक हंगाम सुरु होण्यापूर्वी कर्णधार पदावरून पायउतार झाला आणि फ्रँचायझीने रवींद्र जडेजाला नवा कर्णधार म्हणून निवडले. जडेजाच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आणि जडेजाने मध्यातच पुन्हा धोनीकडे चेन्नई संघाची धुरा सोपवली. यानंतर जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. गतविजेता चेन्नई १३ पैकी ४ सामने जिंकून ९ व्या स्थानावर आहे. एव्हढचं नाही तर या संघातील खेळाडूंच्या आणि संघाच्या मतभेदाबाबतही वृत्त पाहायला मिळाले.
कोलकाताला नाही मिळाली भक्कम प्लेइंग इलेव्हन
लिलावात कोलकाताने श्रेयस अय्यरवर दाव लावला आणि मोठी रक्कम मोजून त्याला संघात घेतले. श्रेयसकडे संघाच्या कार्धार पदाची जबाबदारी देण्यात आली. श्रेयसच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स, आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक वेळा प्लेइंग इलेव्हन बदलताना दिसले. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यातही संघात तीन बदल करण्यात आले. संघाला सलामीचे अचूक संयोजन मिळू शकले नाही तर त्यांची गोलंदाजीही मजबूत दिसली नाही. अशा परिस्थितीत कोलकाताला हंगामाच्या अखेरपर्यंत परिपूर्ण प्लेइंग इलेव्हन मिळू शकले नाही. परिणामी १४ सामन्यांतील ८ सामने गमावून संघ स्पर्धेबाहेर पडला.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com