मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५२वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (IPL 2022 PBKS vs RR) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मागील काही सामन्यात राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर आपल्या तुफानी फलंदाजीने चर्चेत राहिला आहे. पण यावेळी तो आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने चर्चेत आला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध बटलरने शिखर धवनचा अप्रतिम झेल एका हाताने टिपून सर्वांनाच चकित केले. सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात बटलरने हा शानदार झेल घेतला. पंजाबच्या संघाने ५ षटकांत ४६ धावा केल्या होत्या. धवन आणि बेअरस्टो यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. धवन अनेकदा अश्विनच्या गोलंदाजीसमोर झुंजताना दिसतो, त्यामुळे कर्णधार संजू सॅमसनने पॉवरप्लेचे शेवटचे षटक अश्विनला टाकण्यास सांगितले. अश्विनच्या पहिल्याच चेंडूवर धवनने मिडऑनवरून मोठा फटका खेळण्याच्या नादात, बटलरच्या हाती झेल देत बाद झाला. बटलरने उंच उडी मारत सुपरमॅन अंदाजात एका हाताने झेल घेत धवनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. धवन १६ चेंडूत १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
What A Catch By Joss The Boss#buttler #rrvspbks #IPL2022 pic.twitter.com/htUEsPyTGY
— Ajjayy Maheta (@AjayJainHere) May 7, 2022
या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला, तर राजस्थान संघात करुण नायरच्या जागी यशस्वी जैस्वालला पुन्हा संधी देण्यात आली.
पंजाबचा डाव
पंजाबने खराब फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टोला आज पुन्हा संधी देत शिखर धवनसोबत सलामीला पाठवले. त्यानेही संधीचे सोने करत फटकेबाजी केली. धवनला (१२) लवकर तंबूत पाठवण्यात रवीचंद्रन अश्विन यशस्वी ठरला. जोस बटलरने धवनचा एकहाती जबरदस्त झेल घेतला. भानुका राजपक्षेने बेअरस्टोसोबत धावा केल्या. त्याने २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा केल्या. अर्धशतक ठोकलेल्या बेअरस्टोला आणि कप्तान मयंक अग्रवालला (१५) फिरकीपटू युझवेंद्र चहलने १५व्या षटकात बाद केले. जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली. १९व्या षटकात प्रसिध कृष्णाने लिव्हिंगस्टोनला (२२) क्लीन बोल्ड केले. २०व्या षटकात जितेशच्या फटकेबाजीमुळे पंजाबने १६ धावा ठोकल्या. जितेशने १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. २० षटकात पंजाबने ५ बाद १८९ धावा केल्या. चहलने ३ बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com