मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ६४वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात खेळवला जात आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना प्लेऑफसाठी विजयाची नोंद करणे आवश्यक आहे. पंजाबचा संघ १२ पैकी सहा सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. त्याच वेळी, दिल्लीने १२ पैकी केवळ ६ सामने जिंकले आहेत परंतु चांगल्या धावगतीमुळे ते पाचव्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांमधील २९ आयपीएल सामन्यांमध्ये पंजाबने १५ तर दिल्लीने १४ सामने जिंकले आहेत.
पंजाब किंग्जने शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ५४ धावांनी जिंकला. जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी संघासाठी तुफानी फलंदाजी केली होती आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही अशीच फलंदाजी अपेक्षित आहे. शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांचेही योगदान अपेक्षित आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडाने सातत्याने विकेट्स घेतल्या आहेत तर अर्शदीप सिंगने डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर ऋषी धवन आणि राहुल चहर यांनीही चांगली कामगिरी केली आहे.
#PBKS have won the toss and they will bowl first against #DelhiCapitals
Live – https://t.co/twuPEouUzK #PBKSvDC #TATAIPL pic.twitter.com/MQSAmcr4o0
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2022
दिल्ली कॅपिटल्सने शेवटचा सामनाही जिंकला. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. पण पृथ्वी शॉची अनुपस्थिती संघाला नक्कीच त्रासदायक ठरली असेल. ऋषभ पंतशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला मधल्या फळीत सातत्यपूर्ण धावा करता आल्या नाहीत. कर्णधार पंतही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे पण त्याची लय पाहता तो लवकरच आपल्या बॅटने मोठी खेळी साकारू शकतो. एनरिक नॉर्कियाच्या आगमनाने गोलंदाजीत संतुलन आले आहे.
दोन्ही संघांची Playing 11
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कप्तान), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com