मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने पंजाब किंग्जविरुद्धच्या (PBKS vs DC) सामन्यात एक मोठी कामगिरी नोंदवली आहे. अक्षर हा आयपीएलमध्ये १०० बळी घेणारा दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. २८ वर्षीय अक्षर पटेलने पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालला बाद करत ही कामगिरी नोंदवली. अक्षरने या सामन्यात चार षटकांत १४ धावांत २ बळी घेतले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने १७ धावांनी आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून १०० किंवा त्याहून अधिक बळी घेण्याच्या बाबतीत दिल्लीच्या अक्षर पटेलपेक्षा पुढे आहे. अक्षर हा १०० बळींचा टप्पा गाठणारा एकूण १७वा गोलंदाज आहे.
Most wickets for left-arm bowlers in the IPL:
Ravindra Jadeja – 132
Ashish Nehra – 106
Zaheer Khan – 102
AXAR PATEL – 101 👏👏#IPL2022 #PBKSvsDC LIVE ▶️ https://t.co/CPNygJkPK5 pic.twitter.com/jqtM622i2w— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 16, 2022
असा रंगला सामना…
आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ६४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर (PBKS vs DC) १७ धावांनी रंगतदार विजय मिळवला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबला १६० धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात पंजाबचा डाव ७ बाद ८७ धावा असा कोसळला असताना जितेश शर्मा आणि राहुल चहर यांनी आक्रमक फटके खेळत दिल्लीला घाम फोडला. पण शार्दुल ठाकूरने अप्रतिम गोलंदाजी केली आणि पंजाबचा विजय लांबवला. शार्दुलने या सामन्यात ४ बळी घेतले. या विजयासह दिल्लीने १४ गुणांसह अंतिम चारमध्ये प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com