IPL 2022 PBKS vs CSK : धवन जोडीची कमाल..! चेन्नईचा अजून एक पराभव; पंजाबनं ११ धावांनी मारली बाजी!
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये वानखे़डे मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला (PBKS vs CSK) ११ धावांनी मात दिली आहे. सलामीवीर शिखर धवनच्या शानदार खेळीनंतरच्या तगड्या गोलंदाजीमुळे पंजाबने हा सामना जिंकला. या हंगामातील ३८व्या सामन्यात पंजाब किंग्जने २० षटकात ४ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सवर १७६ धावाच करता आल्या. पंजाबकडून धवनने ८८ धावांची नाबाद खेळी खेळली आणि भानुका राजपक्षेसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्याचबरोबर कगिसो रबाडा आणि ऋषी धवन या वेगवान गोलंदाजांनी २-२ तर संदीप शर्मा, अर्शदीप सिंग यांनी १-१बळी घेतला.
पंजाबने मोसमातील ८ सामन्यांत चौथा विजय नोंदवला, तर चेन्नईला तितक्याच सामन्यांत सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबचे आता ८ गुण झाले असून संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईकडून अंबाती रायडूने ७८ धावांची शानदार खेळी केली. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकार ठोकले. अंबाती आणि कर्णधार रवींद्र जडेजाने पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. रायुडूने ऋतुराज गायकवाडसोबत चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारीही केली. रायुडू डावाच्या १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला २७ धावांची गरज होती, धोनी तिसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि चेन्नईच्या विजयाच्या आशा मावळल्या. धोनीने ११ धावा केल्या.
That's that from Match 38.@PunjabKingsIPL win by 11 runs.
Scorecard – https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL pic.twitter.com/7tfDgabSuX
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
पंजाबचा डाव
कप्तान मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी पंजाबच्या डावाची संयमी सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी ३७ धावा केल्यानंतर पंजाबने एका फलंदाजाला गमावले. चेन्नईला महीश तिक्षणाने पहिले यश मयंकच्या (१८) रुपात मिळवून दिले. त्यानंतर भानुका राजपक्षे आणि धवनने शतकी भागीदारी रचली. या सामन्यात धवनने आयपीएलमधील ६००० धावांचा टप्पा ओलांडला. १८व्या षटकात भानुका माघारी परतला. त्याने २ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. १९व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन आणि धवनने २२ धावा चोपल्या. लिव्हिंगस्टोन शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह १९ धावा केल्या. ब्राव्होने टाकलेल्या या षटकात पंजाबला १२ धावा मिळाल्या. २० षटकात पंजाबने ४ बाद १८७ धावा केल्या. धवनने ९ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली. चेन्नईकडून ब्राव्होने सर्वाधिक २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महीश तिक्षणा.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com