मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या हंगामात मुंबई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून सगळ्यात आगोदर बाहेर पडला. आयपीएल (IPL)स्पर्धेत पाच वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदाच्या हंगामात तब्बल ९ सामन्यात पराभव पत्करावे लागले आहेत. आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे. त्यांचे १२ सामन्यात ३ विजयासह ६ अंक आहेत. त्यांचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील त्यांचे केवळ दोन सामने शिल्लक असून यामधील एक सामना आज हैदराबाद संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्यात तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी मिळणार का? याकडे मुंबई इंडियन्स फॅन्सचे लक्ष लागून आहे. त्यात सामन्यापूर्वी सोमवारी मुंबई इंडियन्सने अर्जून तेंडूलकरचा चेंडू हातात पकडलेला एक फोटो शेअर केल्याने आता तरी अर्जूनला संधी मिळणार का या चर्चेला आणखीच उधाण आले आहे.
💫 Slower one or a fast yorker 🔥
Arjun seems to be caught in two minds 🤨#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/pk6yTbc9e2
— Mumbai Indians (@mipaltan) May 16, 2022
मुंबईने अर्जुनला आयपीएल लिलावात ३० लाख एवढी रक्कम दिलेली आहे. अर्जून एक अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याच्या दमदार उंचीमुळे तो भेदक गोलंदाजी करतो. दरम्यान मुंबई इंडियन्सने अर्जूनचा चेंडू हातात पकडलेला एक फोटो शेअर केला असून त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘स्लोवर बॉल टाकू कि फास्टर यॉर्कर, अशा दोन विचारांत अर्जून असावा.’ असं कॅप्शन मुंबईने दिलं आहे.
जब बेचारे को खिलाना ही नही है प्लेइंग 11 में
तो फोटो क्यों डालता है
Le Arjun Tendulkar fans are like 👇 pic.twitter.com/NzQsgB5I8b— S P Sahu (@spsahu01) May 16, 2022
आज मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईने हा फोटो शेअर केल्याने फॅन्सकडून आतातरी अर्जूनला संधी द्यावी अशी मागणी होत आहे. अनेक पोस्ट आणि मीम्स सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
1 match to khilao bhai ko pic.twitter.com/KWEy1XgE2l
— Danish Khan (@Danpeace024) May 16, 2022
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com