Share

IPL 2022 : रोहित शर्माला २४ लाखांचा दंड; मुंबई इंडियन्सवर ‘मोठी’ कारवाई!

पुणे : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीची मालिका सतत सुरूच आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्धही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. संघाचा या मोसमातील हा पाचवा पराभव आहे. संघाचा पराभव तर झालाच, शिवाय त्यांच्यावर मोठी कारवाईही झाली. स्लो ओव्हर रेटसाठी मुंबई इंडियन्स संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला.

स्लो ओव्हर रेटसाठी मुंबई इंडियन्स दोषी आढळण्याची या स्पर्धेत दुसरी वेळ आहे. याआधीही संघाने एकदा ही चूक केली आहे. या कारणास्तव यावेळी कर्णधार रोहित शर्माला २४ लाख आणि प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना सहा लाख किंवा त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतरही रोहित शर्मावर स्लो ओव्हर रेटसाठी कारवाई करण्यात आली होती. रोहित शर्मावर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. मुंबईच्या संघाला निर्धारित वेळेत षटक पूर्ण करता आले नाहीत.

असा रंगला सामना…

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२मध्ये सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईला १२ धावांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या रोहितने गोलंदाजी स्वीकारली. पंजाबने मुंबईला १९९ धावांचे तगडे आव्हान दिले आहे. शिखर धवन, मयंक अगरवाल यांनी अर्धशतके ठोकत पंजाबला उत्तम सुरुवात करून दिली. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकात १८६ धावांपर्यंतच पोहोचता आले. शेवटच्या काही षटकात मुंबईने महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि पंजाबने सामना हिसकावून घेतला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

पुणे : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीची मालिका सतत सुरूच आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्धही संघाला पराभवाचा …

पुढे वाचा

Marathi News Sports