मुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार एमएस धोनी जगभरातील आणि भारतातील त्याच्या बहुतेक चाहत्यांसाठी नंबर १ खेळाडू आहे. ‘थाला’ धोनी चेन्नईमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे धोनी मात्र मैदानाबाहेर स्वतःला नंबर १ मानत नाही. नवीन आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी एका कार्यक्रमात, धोनीने चाहत्यांशी काही ‘वैयक्तिक प्रश्न’ घेऊन संवाद साधला. तेव्हा त्याने याबद्दल सांगितले.
चेन्नई सुपर किंग्सने (CSK) धोनीचा (MS Dhoni) चाहत्यांसोबत संवादाचा व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात एका चाहत्याने धोनीला घरी नंबर १ कोण आहे असा प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर देताना धोनी हसत म्हणाला, ” मागे वळून पाहिले तर अर्धे लोक अजून हसत आहेत. प्रत्येकाला माहित आहे की घरात पत्नीच नंबर १ असते.” धोनीचे पत्नी साक्षीशी लग्न होऊन आता एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, या जोडप्याने २०१० मध्ये लग्न केले. साक्षी आणि एमएस धोनी यांना झिवा नावाची मुलगी आहे.
धोनीची बायको साक्षी नेहमी त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टँड्समध्ये उपस्थित असते. महिला दिनाच्या निमित्ताने चेन्नईने भरवलेल्या एका चर्चा सत्रात तिने क्रिकेटरची बायको असण्यामागील त्रासाबाबत सांगितले होते. तसेच तिने क्रिकेटरचे वैयक्तिक आयुष्य कसे असते याबाबतही सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- “लोकांचे प्राण धोक्यात घालून राजकारण करण्याची मानसिकता”- संजय राऊत
- “केंद्रीय तपास यंत्रणा पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम…” ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
- IPL 2022: पंजाब किंग्ससाठी ओपनींग जोडी कोण असणार; शिखर धवनने केला खुलासा
- “२०२४ ला महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं…”, देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
- होळी साजरी करताना डीजे-डॉल्बी लावण्यास बंदी; राज्य सरकारची नियमावल्ली जारी..