मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादने लीगच्या ६५व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI vs SRH) ३ धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या विजयासह हैदराबादचे १३ सामन्यांतून १२ गुण झाले असून ते १० संघांच्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने या सामन्यात तीन विकेट घेतल्या. यादरम्यान उमरानने जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रमही मो़डला.
२२ वर्षीय उमरान आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा सर्वात तरुण भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएल २०२२मध्ये त्याच्या विकेट्सची संख्या २०च्या पुढे नेली आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत उमरान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने हैदराबादसाठी करो या मरोच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ षटकांच्या स्पेलमध्ये २३ धावांत ३ बळी घेतले. यासह उमरान हा आयपीएलच्या एका मोसमात २० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा सर्वात तरुण भारतीय गोलंदाज ठरला आहे.
THREE FOR UMRAN. The #JammuExpress and @priyamg03149099 combine again to get rid of Daniel Sams. 💪🏾#MIvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/SuxCgBTajd
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 17, 2022
यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. बुमराहने २०१७ मध्ये हा विक्रम केला होता. पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडानंतर उमरान हा आयपीएलच्या या हंगामात २० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. रबाडाच्या नावावर १३ सामन्यात २२ बळी आहेत. उमरानने वयाच्या २२ वर्षे १७६ दिवसात आयपीएलच्या एका मोसमात २०चा आकडा गाठला आहे. यापूर्वी बुमराहने २०१७ मध्ये २३ वर्षे १६५ दिवसांच्या वयात हा विक्रम केला होता.
या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईसाठी रोहित-इशानने चांगली सुरुवात केली. त्यानंतर मधली फळी ढासळल्यानंतर टिम डेव्हिडने धुवांधार फलंदाजी करत सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, पण १८व्या षटकात तो बाद झाला आणि मुंबईने सामना गमावला. हा मुंबईचा दहावा पराभव ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com