IPL 2022 MI vs DC : “प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या…”, विजयानंतर रोहितचा RCBला संदेश; विराटनं दिलं ‘असं’ उत्तर!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चालू हंगामात विजयाचा निरोप घेतला. शनिवारी झालेल्या मोसमातील ६९व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा (MI vs DC) ५ गडी राखून पराभव केला. या पराभवाने दिल्लीचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा फायदा झाला आणि प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो चौथा संघ ठरला. दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर रोहितनेही बंगळुरूला शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही मुंबईला टॅग करत हँडशेक इमोजी ट्विटरवर पोस्ट केला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि त्याचे चाहतेही मुंबई इंडियन्ससाठी प्रार्थना करत होते. एवढेच नाही तर ग्लेन मॅक्सवेलने सोशल मीडियावर मुंबईचा जयघोषही केला. त्याचवेळी विराटनेही मुंबईला साथ दिली. याशिवाय, बंगळुरू फ्रेंचायझीने आपल्या ट्विटरवरील लोगोचा रंग निळ्यामध्ये बदलला होता, जो मुंबईच्या जर्सीचा रंग देखील आहे.

सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ”आम्ही थोडे उशीरा लयीत आलो, पण किमान या स्पर्धेतून काही सकारात्मक गोष्टी तरी घेऊ शकलो. आरसीबीचे अभिनंदन, ते पात्र ठरले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वोत्तम संघ विजयी होवो.” त्याचवेळी विराट कोहलीने मुंबई इंडियन्स आणि बंगळुरू संघाला टॅग करत हँडशेक इमोजी पोस्ट केला. बंगळुरू आता कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर २५ मे रोजी एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सशी भिडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com