मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ६३वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात होत आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याने हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
या मोसमात, लखनऊने आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये ८ विजय नोंदवले आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने १२ पैकी ७ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. लखनऊ संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करायचे आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सला आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक असेल.
🚨 Toss Update from Brabourne Stadium – CCI 🚨@rajasthanroyals have elected to bat against @LucknowIPL.
Follow the match 👉 https://t.co/9jNdVDnQqB #TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/7CFi4G2N11
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
१० एप्रिल रोजी उभय संघांमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. शिमरॉन हेटमायरने लखनऊविरुद्ध ५९ धावांची शानदार खेळी खेळली. लखनऊसाठी क्विंटन डी कॉकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक ३९ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून लखनऊविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात युझवेंद्र चहलने जबरदस्त गोलंदाजी करताना ४ विकेट घेतल्या होत्या.
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, मोहसिन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, आवेश खान
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन(यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, जेम्स नीशम, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मकॉय.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<