मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ६३वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल (४१) आणि देवदत्त पडिक्कल (३९) यांच्या जोरावर राजस्थानने लखनऊला १७९ धावांचे आव्हान दिले आहे.
राजस्थानचा डाव
जोस बटलर पुन्हा एकदा चांगली सलामी देण्यात अपयशी ठरला. लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने बटलरची (२) दांडी गूल केली. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनसोबत यशस्वी जयस्वालने अर्धशतकी भागीदारी केली. चांगले फटके खेळणारा सॅमसन पुन्हा एकदा बेजबाबदार फटका खेळून जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ६ चौकारांसह ३२ धावा केल्या. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या जयस्वालला आयुष बदोनीने तंबूत पाठवले. जयस्वालने ६ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने १८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांची झटपट खेळी केली. १४व्या षटकात रवी बिश्नोईने त्याला फसवले. त्यानंतर रियान पराग (१७), जिमी नीशम (१४) आणि ट्रेंट बोल्ट (१७) यांच्या धावांच्या जोरावर राजस्थानने २० षटकात ६ बाद १७८ अशी मजल मारली. लखनऊकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक २ बळी घेतले.
END OF INNS: Royals 178/6 (20/20 ov, won the toss) v Super Giants
Boult 17 (9) Ashwin 10 (7)https://t.co/Z9JSOOzO5h— ESPNcricinfo scores (@ESPNscorecard) May 15, 2022
T.I.M.B.E.R 🎯
Avesh Khan has castled Jos Buttler's stumps for the second time in IPL 2022 🔥#AveshKhan #JosButtler #RRvsLSG #IPL2022 #Cricket pic.twitter.com/CMhlprud5t
— Wisden India (@WisdenIndia) May 15, 2022
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, मोहसिन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, आवेश खान
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन(यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, जेम्स नीशम, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मकॉय.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com