मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) ची नवीन फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊने कोलकाता नाइट रायडर्सचा (LSG vs KKR) २ धावांनी पराभव केला. लखनऊच्या या थरारक विजयाने संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर खूप खूश होता. डगआऊटमध्ये बसून गंभीरने आपल्या खास पद्धतीने विजय साजरा केला. त्याने खेळाडूंना मिठी मारली. गंभीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या विजयासह लखनऊचे १४ सामन्यांतून १८ गुण झाले असून त्यांनी १० संघांच्या गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी २००हून अधिक धावा केल्या.
WHAT. A. GAME !!@LucknowIPL clinch a thriller by 2 runs.
Scorecard – https://t.co/NbhFO1ozC7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/7AkXzwfeYk
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
His Aggression>>>>✨💜
Happy for @GautamGambhir
Bring it home boys @LucknowIPLVC:-@IPL pic.twitter.com/dC31bdZKjN
— Aditya♥️ (@switch_hit18) May 18, 2022
असा रंगला सामना…
क्रिकेटप्रेमींना आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये डीवाय पाटील स्टेडियमवर चित्तथरारक लढतीचा आनंद घेता आला. केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने अवघ्या २ धावांनी कोलकाता नाइट रायडर्सला (KKR vs LSG) मात दिली आणि १८ गुणांसह प्लेऑफचे तिकीट मिळवले. कोलकातासाठी करो या मरो असलेल्या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीच्या जोरावर लखनऊने कोलकाताला २११ धावांचे आव्हान दिले. सलीमीवीर डी कॉकने १० चौकार आणि १० षटकारांची आतषबाजी करत १४० धावांची शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात अवघड वाटणाऱ्या या आव्हानाला कोलकाताने शेवटपर्यंत तोंड दिले. शेवटच्या षटकात २१ धावांची गरज असताना रिंकू सिंह मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि कोलकाताने हा सामना गमावला. या पराभवामुळे कोलकाताचे हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com