मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६६वा सामना गुरुवारी लखनऊ सुपर जायन्ट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात लखनऊने कोलकातावर २ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सुरुवातीला लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊच्या सलामीवीरांनी नाबाद राहून २१० धावा बनवल्या. यामध्ये केएल राहुलने ६८ धावा तर क्विंटन डी कॉकने १४० धावा बनवल्या. कोलकाताच्या कोणत्याही गोलंदाजाला एकही गडी बाद करता आला नाही. प्रत्युत्तरात कोलकाताकडून रिंकू सिंहने शेवटच्या क्षणाला फलंदाजीला येऊन मैदानात धावांचा पाऊस पडला. त्याने १५ चेंडूतच ४० धावा चोपल्या. मात्र कोलकाताला सामन्याच्या शेवटच्या ३ चेंडूत सामना गमवावा लागला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर नक्कीच सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स प्ले ऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. आता उर्वरित दोन जागांसाठी पाच संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असले, तरीही ते उर्वरित संघांची समीकरणे बिघडू शकतात. लखनऊ सुपर जायंट्सच्या दोन धावांनी रोमहर्षक विजयानंतर बोलताना केएल राहुलने गमतीने म्हटले की, अशा सामन्यांसाठी मला अतिरिक्त पैसे मिळायला हवेत.
Record-breaking opening stand 🔝
Century celebration 🔥
QDK picking himself in his fantasy team? 🤔The dynamic duo of @QuinnyDeKock69 & captain @klrahul sums up @LucknowIPL's final-ball win. 👍 👍 – By @ameyatilak
Full interview 🔽 #TATAIPL | #KKRvLSG https://t.co/pzjXZx6d6L pic.twitter.com/Ik0MqtMm8y
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
“मला अशा सामन्यांसाठी आणि खेळासाठी कदाचित जास्त पैसे मिळायला हवेत. आम्ही या हंगामात बरेच सामने असे गमावले आहेत जे शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले नाहीत, कदाचित काही शेवटच्या षटकापर्यंत गेले. या सामन्यात विजय मिळाल्याचा आनंद आहे. आम्ही सहज पराभूत होऊ शकलो असतो. आमच्या काहीश्या खराब क्रिकेटमुळे आम्ही हरलो असा विचार करून घरी परतलो असतो. आम्ही लीग हंगामातील शेवटचा सामना चांगल्याप्रकारे समाप्त केला आहे. सामन्यात असा शानदार खेळ करण्याचे श्रेय दोन्ही संघांना दिले पाहिजे. मी असे म्हणू शकत नाही की आम्ही संयम राखले कारण ही तीन धावांची बाब होती,” असे केएल राहुल सामन्यानंतर बोलताना म्हणाला.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com