मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील ६१वा सामना हैदराबाद आणि कोलकत्ता यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळायला जाईल.
पहिल्यांदाच आयपीएलच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. एवढेच नव्हेतर, यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज बाहेर झाले आहेत. आता सात संघामध्ये उर्वरित तीन जांगासाठी रस्सीखेच सुरू आहे. या शर्यतीत हैदराबादचा संघही आहे. हैदराबादला प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यसाठी पुढील तीन सामने जिंकावे लागतील. जरी हैदराबादनं एखादा सामना गमावला तरीही त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. परंतु, त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार.
MCA Stadium 🏟, here we come! 🚌#KKRvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/LsxO1yykwv
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 14, 2022
एक पराभवाचं आणि हैदराबादच समीकरण
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाल्यास त्यांच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग खडतर होईल. सध्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी १४-१४ गुण आहेत. राजस्थान आणखी दोन तर, रॉयल चॅलेंजर्सला एक सामना खेळायचा आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांचे प्रत्येकी १२-१२ गुण आहेत. दोन्ही संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com