मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022)चा हंगाम आता अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता संघाला या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही. आजचा सामना कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता साठी ‘करो या मरो’ची लढत असेल. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सोडता इतर संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी रणनीती आखत आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि मुंबई हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. उर्वरित तीन जागांसाठी सात संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्स यांचादेखील समावेश आहे.
आयपीएल (IPL)च्या यंदाच्या हंगामात कोलकाताने १२ सामन्यांत ५ मध्ये विजय मिळवला असून त्यांचे गुणतालिकेत १० अंक आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कोलकाता संघ सर्वात खाली आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी कोलकाताच्या संघाला त्याचे पुढील दोन्ही सामने मोठा विजय मिळवणे गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे, हे दोन्ही सामने जिंकल्यानंतरही कोलकाताला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. तर, प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी कोलकाताचं समीकरण कसं असणार? यावर एक नजर टाकुयात.
For one last time to Pune 🚎#AmiKKR #KKRvSRH #IPL2022 pic.twitter.com/mmullRxGRX
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 14, 2022
कोलकाताची प्लेऑफची रणनीती अशी असेल
कोलकाताचा संघ आज हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर त्यांचा या हंगामातील अखेरचा सामना लखनऊ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात कोलकाताला मोठा विजय मिळवणं गरजेचं आहे.
आरसीबी त्यांच्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली पाहिजे. या पराभवानमुळं आरसीबीचे 14 गुण होतील.
दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत होणं गरजेचं आहे. दिल्लीचे पुढील दोन सामने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहे.
पंजाब किंग्जलाही त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव होणं कोलकात्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. पंजाब त्यांचे पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबादशी खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com