मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) चा ६१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने हैदराबादला १७८ धावांचे लक्ष दिले आहे. उमरान मलिकने एकाच षटकामध्ये २ गडी बाद करत कोलकाताला अडचणीत आणले होते. कोलकाताची सुरुवात खराब झाली. व्यंकटेश अय्यर लवकरच बाद झाल्याने अजिंक्य रहाणे आणि नितेश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अजिंक्य रहाणे ने २८ तर नितीश राणाने २६ धावांची खेळी खेळली. त्यानंतर सॅम बिलिंग आणि आंद्रे रसेल यांनी संयमी खेळी दाखवत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. सॅम बिलिंग ने ३४ तर आंद्रे रसेलने ४९ धावांची खेळी केली. हैदराबाद कडून उमरान मलिकने सर्वाधिक ३ गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!@umran_malik_1 was the pick of the @SunRisers bowlers. 👌 👌
@Russell12A scored a cracking 49* to power @KKRiders to 177/6. 👏 👏The #SRH chase to begin shortly. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/BGgtxVmUNl#TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/v6ChFiAX6p
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग 11
हैदराबाद – केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंह, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन
कोलकाता – श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, सुनील नरेन, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती