IPL 2022 : मुंबईचा जसप्रीत बुमराह आणि कोलकात्याच्या नितीश राणावर दंडात्मक कारवाई!
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील (KKR vs MI) सामन्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज नितीश राणा यांना दंड ठोठावण्यात आला. हे दोन्ही खेळाडू सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले असून त्याआधारे कारवाई करण्यात आली. नितीश राणाला दंड ठोठावण्यात आला, तर बुमराहला इशारा देऊन सोडून देण्यात आले.
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४ बाद १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, कोलकातानेन १६व्या षटकात विजय नोंदवला.
बुमराह आणि राणा यांना सामना अधिकाऱ्यांनी शिक्षा सुनावली. राणाला त्याच्या मानधनाच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणत्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 LSG vs DC : पंत विरुद्ध राहुल; लखनऊ साधणार का विजयी हॅट्ट्रिक?
- “२२ एप्रिलपर्यंत कामगार आले नाहीत तर…”; अनिल परबांचा इशारा
- “ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद” – गोपीचंद पडळकर
- IPL 2022 : “माझ्यासाठी धोनीला माहीभाई म्हणणं अवघड होतं”, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूचा खुलासा!
- परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार – बाळा नांदगावकर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com