मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये स्पर्धेतील ६६वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (KKR vs LSG) यांच्यात खेळवला जात आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. लखनऊने विजय नोंदवला तर ते प्लेऑफमधील स्थान निश्चित करतील. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केकेआरला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स १३ पैकी ८ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर कोलकाता १३ पैकी सहा सामने जिंकून सहाव्या स्थानावर आहे.
आज लखनऊने एविन लुईस, कृष्णप्पा गौतम आणि मनन वोहरा यांना संधी दिली आहे. तर कोलकाताने दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेऐवजी अभिषेक तोमरला संघात घेतले आहे. लखनऊने त्यांचे शेवटचे दोन सामने गमावले आहेत आणि संघ अद्याप प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये वाईट फलंदाजी संघासाठी अडचणीची ठरली आहे. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक लवकर बाद झाल्याने संपूर्ण बॅटिंग ऑर्डर खराब ठरली. गोलंदाजीत संघाकडे अनेक पर्याय आहेत आणि गरज असताना सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकच सामना झाला असून त्या सामन्यात लखनऊने ७५ धावांनी विजय मिळवला.
#LSG have won the toss and they will bat first against #KKR.
Live – https://t.co/NbhFO1ozC7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/SMb8cDc0s9
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
आजचा सामना कोलकातासाठी अत्यंत महत्त्वाचा असून संघाला आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागणार आहे. केकेआरसाठीही संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी अडचणीची ठरली आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये संघाने स्थिर संयोजन खेळण्याचा प्रयत्न केला पण अजिंक्य रहाणे बाहेर पडल्यानंतर संघाला पुन्हा एकदा सलामीची जोडी बदलली आहे. आंद्रे रसेलने गेल्या सामन्यात जबरदस्त अष्टपैलू खेळ दाखवला होता आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौत, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई.
कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), रिंकू सिंह आंद्रे रसेल, सुनील नरिन, उमेश यादव, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com