IPL 2022 : हाऊ इज द जोश..! मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढत बटलरनं ठोकलं शतक; पाहा VIDEO
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन बलाढ्य संघ आज आमनेसामने आले आहेत. आज रंगणाऱ्या या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानने शानदार सुरुवात केली आहे. ज्यात सलामीवीर जॉस बटलरने अप्रतिम फलंदाजी करत या हंगमातील पहिले शतक ठोकले आहे.
सलामीला आलेल्या जॉसने (joss buttler) सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळणे सुरु केले. मुंबईकडून तिसरी ओव्हर टाकायला आलेल्या बेसिल थंपीच्या ओव्हरमध्ये त्याने धुव्वा उडवला. त्याने दोन चौकार आणि ४ षटकार लगावत तब्ब्ल २६ धावा काढल्या. तसेच यावेळी तो १९० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता. त्याने या दरम्यान १०१ मीटरचा लांबलचक षटकारही लगावला. बेसिलची ती ओव्हर आयपीएल २०२२ ची सर्वात महागडी ओव्हर ठरली. बटलर तिथेच थांबला नाही तर त्याने पुढेही याच गतीने खेळ सुरु ठेवत शतक झळकवले.
या सामन्यात जॉस बटलरने केवळ ३२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. एकेकाळी मुंबईकडून खेळलेल्या बटलरने आज मुंबईलाच धुवून काढले आहे. शतक करताना त्याने ६६ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकार लगावत शतक पूर्ण केले आहे. जॉसची खेळी बघून क्रिकेट रसिक सुखावले आहेत. त्याचे हे दुसरे आयपीएल शतक ठरले आहे. तसेच ८ सामन्यानंतर या हंगामाचा पहिला शतक आला आहे. तसेच बटलर आयपीएलमध्ये शतक ५ वा लगावणारा खेळाडू ठरला. त्याआधी इंग्लिश खेळाडूंमध्ये के पीटरसन १०३* विरुद्ध डेक्कन २०१२ , बी स्टोक्स १०३* विरुद्ध गुजरात २०१७ , जे बेअरस्टो ११४ विरुद्ध आरसीबी २०१९ आणि १०७* विरुद्ध MI २०२०, तर जे बटलर १२४ विरुद्ध SRH २०२१ यांचे शतक आले होते.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सुभाष घई यांच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ चित्रपटाचे पोस्टर आउट
- IPL 2022 : जबरदस्त..! मुंबईविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसननं ठोकलं द्विशतक
- IPL 2022 : एकेकाळी मुंबईसाठी खेळणाऱ्या बटलरनं मुंबईलाच धुतलं; एका ओव्हरमध्ये ठोकल्या २६ धावा!
- गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AAP ला गांधींची आठवण!
- यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था १ कोटी ट्रिलीयन डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्टं – अजित पवार