मुंबई: आयपीएलच्या १६ व्या सामन्यात आज या हंगामातील एकही सामना न गमावलेल्या हार्दिकच्या (Hardik pandya) गुजरात टायटन्सचा सामना मयंकची (mayank agrawal) पंजाब किंग (GT vs PBKS) करणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांच्या कामगिरीची तुलना केल्यास,पंजाब संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात CSK संघाचा ५४ धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला आहे. PBKS संघ सध्या ३ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. तर गुजरात ३ऱ्या स्थानी.
गुजरात संघ (GT) या सामन्यातही चांगली कामगिरी करून स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर पंजाब संघालाही त्यांच्या मागील सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करायची असेल, जर दोन्ही संघांनी त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी केली तर त्यांच्यात बरोबरी होईल. या दोन्ही संघात आज चुरशीची लढत दिसेल.
मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात पीच मुख्य भूमिका बजावेल. गेल्या काही सामन्यांवर नजर टाकली तर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल दिसते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूपच सोपे दिसत असले तरी या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही खूप मदत मिळते. पहिल्या डावात फलंदाजी करणे दुस-या डावाच्या तुलनेत अवघड वाटते, इथे पहिल्या डावाची सरासरी १६५ धावा आहे. तसेच ड्यूचा मुद्दाही महत्वाचा ठरू शकतो. ज्यामुळे नाणेफेक सामन्याचा निकाल सांगू शकते.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “वाचाळ आणि गचाळ बडबड दुसरं काही नाही”, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर राम सातपुतेंचा टोला
- IPL 2022: दिल्लीचा दुष्काळात तेरावा महिना; पराभवानंतर कर्णधार ऋषभला भरावा लागणार लाखोंचा दंड!
- “महागाईमुळे सामान्य जनता हवालदिल असताना आता औषधाचे दर…”, राष्ट्रवादीचा केंद्रावर निशाणा
- राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा आठवतोय का कुणाला?; अमेय खोपकरांनी मिटकरींना पुन्हा डिवचले
- IPL 2022 DC vs LSG: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा उलटफेर, दिल्लीच्या ‘या’ खेळाडूची पर्पल कॅपच्या यादीत वापसी