मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022 ) हंगामातील प्ले ऑफ मधील पहिला क्वालिफायर सामना गुजरात आणि राजस्थान यांच्यात खेळायला गेला. या सामन्यात गुजरात नी राजस्थानवर सात गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे गुजरातचा संघ आता थेट आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डेव्हिड मिलरने ६८ धावांची विजयी खेळी केली. त्याने आयपीएल २०२२ हंगामात वादळ निर्माण केले आहे. गुजरात टायटन्सकडून खेळताना, मिलरने क्वालिफायर-१ सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्यामुळे या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला. राजस्थानवरील विजयासह गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सामन्याचा हिरो डेव्हिड मिलर ठरला. त्याने ३८ चेंडूत ६८ धावांची विजय खेळी खेळली. या कामगिरीमुळे मिलरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाचं म्हणजे यावेळी मेगा लिलावात डेव्हिड मिलर पहिल्या फेरीत विकला गेला नव्हता अनसोल्ड राहिला होता. दुसऱ्या फेरीत पुन्हा नाव आल्यावर मिलरला १ कोटी रुपये आधारभूत किमतीसह खरेदी करण्याची स्पर्धा लागली होती. ही स्पर्धा फक्त राजस्थान रॉयल्स आणि गुजरात संघ यांच्यात होती. राजस्थानने पहिली बोली लावली. यानंतर १६वी बोली लावून गुजरातने मिलरला ३ कोटी रुपयांना विकत घेतले.
Congratulations to the @gujarat_titans as they march into the Final in their maiden IPL season! 👏 👏
Stunning performance by @hardikpandya7 & Co to beat #RR by 7⃣ wickets in Qualifier 1 at the Eden Gardens, Kolkata. 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/yhpj77nobA
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
खेळीची सावध सुरुवात अन त्यानंतर आक्रमक फलंदाजी
मिलरने त्याच्या खेळीची सुरुवात संथपणे केली होती. पहिल्या १४ चेंडूत त्याने केवळ १० धावा केल्या, कारण गुजरात संघाने ८५ धावांत ३ गडी गमावले होते. त्यामुळे मिलरने खेळपट्टीवर स्थिरावण्यास वेळ घेतला. त्यानंतर त्याच्या बॅटमधुन आक्रमक फटके पहायला मिळाले. १४ चेंडूनंतर मिलरने पुढच्या २४ चेंडूत ५८ धावा केल्या. यादरम्यान मिलरने ५ षटकार ठोकले. शेवटच्या षटकात गुजरातला १६ धावांची गरज असताना मिलरने पहिल्या ३ चेंडूवर ३ षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.
गुजरातची राजस्थानवर ७ गड्यांनी मात
सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानी प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८८ धावा केल्या. जोस बटलरने ५६ चेंडूत ८९ आणि संजू सॅमसनने २६ चेंडूत ४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात संघाने ३ बाद १९१ धावा करताना ७ गडी राखून सामना जिंकला. डेव्हिड मिलरने ३८ चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी खेळली.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<